नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणारी आगामी ६ सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर यांच्या सह डेटा विश्लेषक G. T. निरोशान यांना इंग्लंड वरून परत आल्यानंतर कोवीड १९ विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
त्यामुळे विलगीकरणाचा कालावधी वाढल्यानं पहिला सामना १३ ऐवजी १७ जूलैपासून खेळला जाण्याची शक्यता आहे. तथापि सामन्याच्या अंतिम तारखा BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी चर्चा करुनच निश्चित केल्या जातील.
0 Comments