मराठी सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या नवनवीन फोटोंनी ती चाहत्यांना तिच्याबद्दल नेहमीच अपडेट देत असते. नुकतंच तिनं स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यात मादक दिसत आहे.
अमृतानं काळ्या रंगाच्या पंजाबी सुटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसतेय. चाहत्यांकडून या फोटोंवर लाइक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. एका चाहत्यानं अशी काही प्रतिक्रिया दिली की अमृतानं त्या कमेंटला उत्तर दिलं आहे.
एका युझरनं अमृताच्या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं की, ‘हे असले घातक फोटोशूट करताना वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे’. या युझरच्या कमेंटला अमृतानंही उत्तर दिलंय. ‘आईने काढलेत फोटो’ असं उत्तर अमृतानं दिल्यानंतर चाहत्यांनी अमृता आणि तिची आई या दोघींचं कौतुक केलंय. ‘मग आई वाघीण आहे, असंही एका युझरनं म्हटलंय.
0 Comments