इंग्रजी कच्चे राहिल्याने आठवीतच नापास; वडीलांनी केली वर्षभर शाळा बंद, पण ‘तो’ जिद्दीने पेटून उठला, आता आहे एका कंपनीचा मालक


करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरूणाने सामान्य बुद्धीमत्ता आसतानाही कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वकमाईतून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे स्वतः ची सॉफ्टवेअर कंपनी उभारली. तिचा विस्तार करत कंपनीच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्या तरुणाचे नाव आहे अंकुश पोळ! ते ३० वर्षाचे आहेत.


जेऊरपासून जवळ असलेल्या शेटफळ येथील अंकुश साहेबराव पोळ यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. आठवीत भारत हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. सामान्य बुद्धीमत्ता व प्राथमीक शाळेत इंग्रजी कच्चे राहिल्याने आठवीतच नापास होण्याची वेळ आली. नापास झाल्याने वडीलांनी शाळा बंद करून शेतातील कामे सांगण्यास सुरुवात केली. उन्हातान्हात शेतातील कष्टाची कामेही नको वाटू लागली. पुन्हा शाळेत जावेआसे वाटू लागले. पण वर्गातील बाकीची मुले पुढच्या वर्गात गेल्यामुळे पुन्हा त्याच वर्गात बसायला नको वाटत होते. शाळा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर कर्जत येथील अमरनाथ हायस्कूलमध्ये आठवीतच प्रवेश घेतला.


घरची परिस्थिती जेमतेम होती. शेतीमध्ये अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने वडीलांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. आशा परिस्थितीत दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणेही शक्य नव्हते. कर्जत येथील वसतीगृहात राहून अंकुश यांचे शिक्षण सुरू झाले. नापास झाल्याची खंत त्यांच्या मनात होती. आता यावर्षी चांगले मार्क्स मिळवायचे या जिद्दीने त्यांनी अभ्यास सुरू केला. शिक्षणाच्या खर्चासाठी शाळेच्या उर्वरित वेळेत मेडिकल स्टोअर्समध्ये काम केले. दहावीला चांगले गुण मिळाले. त्यानंतर त्यांनी सोलापूर येथील ब्रम्हदेव माने पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथेही शिक्षणाच्या कालावधीत दोन- तीन ठिकाणी रात्रपाळीत पार्टटाइम जॉब करत अभ्यास करून पदवीका अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर सांगली जिल्ह्यातील वीटा येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केले. ते करत असताना शिक्षणाची फी वडीलांनी दिली तरी बाकी इतर खर्चासाठी तेथेही पडेल ते काम केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन तीन ठिकाणी नोकरीचा प्रयत्न केला. अपक्षीत पगार व समाधान मिळत नसल्याने शिक्षणाच्या कालावधीत जोडलेल्या मित्रांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे स्वतः ची छोटीशी सॉफ्टवेअर कंपनी उभारली. अनेक चालेंजींग कामे स्विकारत वेळेत पूर्ण करून ग्राहकांना उत्कृष्टसेवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.


नवनविन गोष्टी आत्मसात करून आपले ज्ञान अद्ययावत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परोपकारी सेवाभावीवृत्ती, कामातील प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी, मैत्रीतून जोडलेली माणसं यामुळे अल्पवधीत त्यांनी चांगला जम बसवत झेप घेतली आहे. गावाकडील सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदतीसह त्यांचा सक्रिय सहभाग आसतो. आपल्याकडील मुलं पुढे गेली पाहिजेत अशी त्यांची नेहमीच भावना असते.


अंकुश पोळ यांचा मार्च २०२१ मध्ये विवाह झाला. पत्नी सुप्रिया व अंकुश पोळ
कॉलेज सुरु असतानाच पुण्यात ६००० रुपयाने एका ठिकाणी आयटी कंपनीत नोकरी केली. नंतर इचलकरंजीच्या एका मुलीची ओळख झाली. आमची चांगली मैत्री झाली. दरम्यान तिचे पती आणि माझा चांगला परिचय झाला. त्यांनीही खूप मदत केली. इचलकरंजी येते कंपनी सुरु करण्यासाठी खर्च कमी येत होता. कंपनी सुरु करण्यासाठी काही मित्रांनी आर्थिक मदत केली. वडिलांची इच्छा होती की कमी पगार मिळाला तरी मी नोकरी करावी. पण मला मात्र नोकरीत रस नव्हता. कंपनी सुरु केल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात मी एकटाच काम करत होतो. त्यानंतर पुन्हा एक मुलगी येते नोकरी करू लागली. २०१९ मध्ये ‘स्मार्ट इचलकरंजी’ नावाचे मॅगजीन सुरु केले. त्यानंतर ऍप तयार करणारी कंपनी सुरु केली. पुढे मुलांना लेक्चर देण्याचेही काम सुरु केले.
-अंकुश पोळ, स्टॉर्मसॉफ्टस् सॉफ्टवेअर कंपनी, इचलकरंजी

Post a Comment

1 Comments

  1. It's very great sir..
    मराठी मीडियम मध्ये शिकल्यानंतर मधूनच इंग्रजी माध्यमात गेल्यावर खुपच अडचणी येतात ..मी सुद्धा या अडचणीतून B. tech in Electronics and Telecommunication मध्ये पुर्ण केल आहे .... पण corona pandemic मुळे न नोकरी मिळाली मुळे वर्षे वाया जात आहे .व काही काम नसल्याने knowledge update.होत नाही.. कृपया सर एक विनंती आहे नोकरी असेल तर सांगा.

    ReplyDelete