बार्शी-सोलापूर रोडवर सौंदरे गावाजवळील पूल वाहून गेल्याने; वाहतूक बंद


रविवारी १८ जुलै च्या रात्री बार्शी तालुक्यातील मुसळधार पाऊस झाला, त्या पावसामुळे बार्शी - सोलापूर रस्त्यावर शहरापासून काही किमी अंतरावर असलेला सौंदये गावाच्या अलीकडील पुलाचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. उर्वरित पूल खचल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. तरीही काही प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत, त्यामुळे काही दुर्घटना झाल्यास त्याच्या त्याला जबाबदार कोण? काही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.

 त्यामुळे, बार्शी - सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने उभी आहेत. 
सौंदरे येथील रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्याठिकाणी मुरूम टाकून रस्ता भरण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments