२ दरोडेखोरांना पांगरी पोलिसांनी केली अटक, ४ लाख ४५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त



पांगरी/प्रतिनिधी:

पांगरी पोलिस ठाणे भादवि कलम ३९५ प्रमाने फिर्यादी अक्षय दशरथ चव्हाण रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर यांनी फिर्याद दिल्याने पांगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यांमध्ये १४ हजार ४०० रुपये अंदाजे १५० लिटर डिझेल व फिर्यादीचे पॉकेट व मोबाईल पैसे फिर्यादीस लोखंडी पाईपने मारहाण करून फिर्यादीचे हात-पाय बांधून जबरीने चोरून नेले बाबत गुन्हा दाखल झाला.

सविस्तर माहिती अशी की चोरी करून पळून जात असल्याबाबत पांगरी पोलिसांना माहिती समजताच पोलिसांनी नारी, चिखर्डे व नारीवाडी गावातील नागरिकांना फोन करून लोकांना सतर्क करून पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस नाईक पांडुरंग मुंडे, पोलिस नाईक सुनिल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश कोठावळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील लोकांच्या मदतीने दोन चोरट्यांना पकडून ताब्यात घेतले.

अटक आरोपींची नावे सतीश अच्युत पवार वय 25 रा.सोनीजवळा, ता.केज, जि.बिड, आकाश सुदाम पवार वय 20 रा.बुक्कनवाडी, ता.जि. उस्मानाबाद अशी नावे असून त्यांची झाडाझडती केली असता एका आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेले फिर्यादीचे पॉकेट मिळून आल्याने त्यांनी चोरी केली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिकअप MH04 - 9554, 4 मोबाइल, 150 लिटर डिझेल, चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला हातपंप व पाईप असा एकूण 4 लाख 45 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
 
अटक आरोपीने आणखी कुठे कुठे चोरी केली आहे याचा अधिक तपास व त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पांगरी करीत आहेत. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे सोलापूर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि सुधीर तोरडमल, पोलीस नाईक पांडुरंग मुंडे,पोलीस नाईक सुनील शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश कोठावळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज भोसले यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments