बार्शी तालुका भाजपाच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांच्या आदेशानुसार तसेच भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन
पावसाळी अधिवेशन- २०२१ रोजी दि.५ जुलै रोजी विधानसभेच्या कामकाजात OBC समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा भाजपच्या आमदारांनी उचलून धरला, परंतु सभागृह अध्यक्षांनी १० मिनिटांकरिता सभा तहकूब केली त्याच १० मिनिटाच्या काळात हंगामी सभागृह अध्यक्ष शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्या केबिन बाहेर भाजप व शिवसेना आमदारांमध्ये बाचाबाची झाली. परंतु हंगामी अध्यक्षांनी सेना आमदारांच्या कृत्याकडे कानाडोळा करत फक्त भाजपच्या १२ आमदारांवरच १ वर्षासाठीची निलंबनाची कारवाई केली. या घटनेचा व हंगामी अध्यक्षांनी सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा भाजपा बार्शी तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध केले.
दडपशाही पद्धतीने आमदार राम सातपुते यांच्यासह भाजपाच्या ज्या १२ आमदार महाविकास सरकारकडून निलंबित करण्यात आलेले आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावे.
अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल. यास पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असेल असा इशारा भाजप च्या वतीने देण्यात आला.
यावेळी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष ऍड.राजश्री डमरे,भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शकील मुलाणी,प्रसिद्धी प्रमुख किरण कोकाटे,सुदीप (बप्पा) पाटील,विक्की जव्हेरी,मुकुंद यादव आदी उपस्थित होते.
0 Comments