भूमच्या उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर लाच घेताना पकडले; उस्मानाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई


 
भूम/प्रतिनिधी:

 टीप्पर,जे.सी.बी.व तीन ट्रॅक्टर  हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी दर महिन्याला १ लाख १० हजार लाचेची मागणी करून  पहिला हप्ता ९० हजार घेऊन दुसरा हप्ता २० हजाराचा घेताना उपविभागीय अधिकारी श्रीमती मनिषा अरुण राशिनकर आणि एका  चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास उस्मानाबादच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. 

 तक्रारदार यांचा एक टीप्पर व त्याच्या पाहुण्यांचा जे.सी.बी.व तीन ट्रॅक्टर हे विना कारवाई  वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी आरोपी श्रीमती मनिषा अरुण राशिनकर ( वय ४५ वर्षे,उप विभागीय अधिकारी,भूम ) व विलास नरसींग जानकर ( वय ३२ वर्षे, कोतवाल, देवळाली सज्जा प्रती नियुक्ती  उप विभागिय अधिकारी कार्यालय भुम वर्ग ४ )  यांनी तक्रारदार याच्याकडे प्रती महिना १,१०,०००/- रुपये लाच मागणी करून तडजोडी अंती ९०,०००/- लाच मागुन त्यापैकी २०,०००/- रुपये लाच कोतवाल च्या हस्ते स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध पो.स्टे.भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही  पोलीस अधीक्षक राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित  ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे  , पोलीस निरीक्षक,  ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांनी मदत केली.

Post a Comment

0 Comments