अकरावी सीईटी’च्या (CET) अर्ज नोंदणीस ऑनलाइन सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी एक लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली आहे, अशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. करोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के जाहीर झाला आहे. यंदा निकालाचा टक्का वाढल्याने नामांकित महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा लागणार आहे. अकरावीसाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी ऑफलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. ती एच्छिक असली तरी या परीक्षेच्या गुणवत्तेवरच प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांवर ‘सीईटी’ न दिलेल्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर प्रवेश देण्यात येणार आहे.
अर्ज नोंदणीसाठी http://cet.mh-ssc.ac.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यानी संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर सकाळपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली. दुपारनंतर अर्ज भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वत:चा बैठक क्रमांक व आईचे नाव याबाबतची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित रकान्यांतील माहिती आपोआप भरली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ई-मेल आयडीही नोंदवावा लागणार आहे. परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्पही आहे. परीक्षेच्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित विषयनिहाय घटकही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला सोयीचे ठरणार आहे.
अकरावी ‘सीईटी’बाबत येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील विभागीय मंडळनिहाय स्वतंत्र हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापासून परीक्षेबाबत इतर काही अडचणी असल्यास त्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुणे विभागीय मंडळासाठी सहसचिव प्रिया शिंदे यांच्याशी 9689192899, सहायक सचिव संगीता शिंदे यांच्याशी 8888339530 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहेत.
0 Comments