बार्शी पुत्र डॉ नवनाथ कसपटे यांच्या सीताफळ संशोधनाची जागतीक स्तरावर दखल ; आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्टरेट बहाल



किंगडम ऑफ टोंगा च्या राष्ट्रकुल विद्यापीठातर्फे दिल्लीत सन्मान 

बार्शी (प्रतिनिधी)- एनएमके-1 गोल्डन सिताफळाचे निर्माते डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांच्या संशोधनाची दखल आता जागतीक स्तरावर घेण्यात आली आहे. #किंगडम_ऑफ_टोंगा या देशातील राष्ट्रकुल विद्यापीठाने अंतराष्ट्रीय दर्जाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी नुकतेच बहाल करून त्यांना सन्मानीत केले.

गोरमाळे (ता. बार्शी) येथील सीताफळ किंग, एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाचे निर्माते व अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांना टोंगा या ओशनिय खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या वतीने कोवीडच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 11 जुलै रोजी दिल्ली येथे एका कार्याक्रमात डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी सन्मानपूर्वक बहाल केली. 

 चक्क परदेशातील एका विद्यापीठाने डॉ. कसपटे यांनी विकसित केलेल्या आणि जगभर प्रसिद्ध होत असलेल्या एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाची दखील घेवून त्यांना कृषी क्षेत्रातील डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली आहे. या सन्मानामुळे डॉ. नवनाथ कसपटे यांचेसह बार्शीच्या शिरपेचात आनखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. कसपटे यांना या संदर्भात मिळणारी ही दुसरी डॉक्टरेट असून, यापूर्वी त्यांना बेंगलोर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मानीत केले होते. 

किंगडम ऑफ टोंगा या ओशनिय खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या विशेष निवड समितीच्या वतीने कोवीडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील उद्योग विहार परिसरातील रॅडीसन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये एका खास समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रिपू रंजन सिंन्हा यांच्या हस्ते कसपटे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली. 


डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे हे गेल्या 45 वर्षापासून सीताफळ शेतीमध्ये काम करत असून, त्यांनी विकसित केलेल्या आणि जगप्रसिद्ध होत असलेल्या एनएमके 1 गोल्डन या सीताफळ वाणाला पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम 2001 अन्वये स्वामीत्व हक्क प्राप्त झाला आहे. 

Post a Comment

0 Comments