बार्शी/प्रतिनिधी:
सोलापूर बार्शी महामार्गावर पानगाव मध्ये एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे, ट्रक व बसचे दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले आहेत. ह्या नंबर ची ट्रक एम एच १३ ए एक्स ७८२७ बार्शी हुन सोलापूर कडे चालली होती तर बस क्रमांक एम एस बी टी ११७५ ही सोलापूर कडून बार्शी कडे येत होती, एसटी बस व ट्रक चा समोरासमोर अपघात पानगाव मध्ये झाला आहे. दोन्ही चालकाला बार्शी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघाताची खबर मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पानगाव मधील रस्त्याचे काम मागील दोन महिन्यापासून बंद आहे, रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा या मागणीसाठी बार्शी तालुका शिवसेना उपप्रमुख लक्ष्मण नाईकवाडी यांनी निवेदने व आंदोनल हि केले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या अपघातास अवताडे कंपनी व बांधकाम विभागातील आधिकऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असेही लक्ष्मण नाईकवाडी यांनी महटले आहे.
0 Comments