हुंडाविरोधी कायदा असूनही आजही आपल्या देशात मुलींचा हुंड्यासाठी छळ होण्याच्या घटना घडतच असतात. मारहाण, मानसिक छळ करून विवाहितेला त्रास दिला जातो.
धौलपूर जिल्ह्यातील बसेडी भागातील एका महिलेवर तिच्या पतीनेच पैसे घेऊन आपल्या मित्रांना आपल्या बायकोवर बलात्कार करण्याची मुभा दिली. दोन दिवस या महिलेवर अनेकांनी बलात्कार केला आणि त्यासाठी पतीने त्या लोकांकडून पैसे घेतल्याची तक्रार या महिलेने केली आहे.
या प्रकरणी या महिलेनं आपला भाऊ आणि वाहिनी यांच्याबरोबर पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली तेव्हा तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसही हादरले. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं तपास अधिकारी प्रवेंद्र सिंह यांनी सांगितलं.
0 Comments