मंगळवेढ्यातील “या” माजी उपसरपंचाने केली गळफास घेऊन आत्महत्या



मंगळवेढा/प्रतिनिधी :

 एका माजी उपसरपंचाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंत दादासाहेब पाटील (वय ६१, रा. ब्रम्हपूरी, ता. मंगळवेढा) यांनी सोलापूर-मंगळवेढा महामार्गालगत बेगमपूर (ता.मोहोळ) इंचगाव दरम्यान एका बंद हॉटेलच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात कामती पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ब्रम्हपुरीचे माजी उपसरपंच असलेले पाटील यांना मागील कांही दिवसांपासून दारूचे व्यसन होते. आज सकाळी ते आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. खूप वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत, म्हणून कुटूंबियांनी शोधाशोध सुरू केली.

यावेळी बेगमपूरपासून दीड किलोमीटर अंतरावर इंचगावकडे जाणाऱ्या महामार्गाच्या अगदी लगतच परंतु मागील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या एका हॉटेलच्या बाहेरील छताला दारूच्या नशेत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी दुचाकी महामार्गाच्या साईड पट्टीवर उभी केल्याचे आढळून आले. गावातील अनेक राजकीय घडामोडीत त्यांचा विशेष सहभाग होता.

Post a Comment

0 Comments