भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोलापुरात रात्री ७.४५ च्या सुमारास घडली आहे.
ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडलीय.
सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर इथं ही घटना घडली आहे. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, गाडीतील कुणालाही दगड लागला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
शरद पवारांवरील टिकेनंतर आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचे समजते.घटना समजताच जोडभावी पेठे पोलीस चौकीचे पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले.कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.पोलिसांनी आमदार पडळकर यांच्यासोबत बंदोबस्त वाढवला आहे.दगडफेक नेमकी कोण केली की अन्य कारणामुळे गाडीची काच फुटली याचा तपास पोलीस करत आहेत.
0 Comments