गुळपोळी सोसायटी अपहार प्रकरण , गेली सहा वर्षापासून गुळपोळी सोसायटीतील पिडीत शेतकरी गोविंद शिवाजी चिकणे, अनुसया बापू यादव, मंगल गोविंद चिकणे, शरद वैजिनाथ चिकणे, दत्तात्रय रामभाऊ भोसले वैजिनाथ दशरथ चिकणे या सहा शेतकरी यांनी वारवंवार तक्रारी केल्यामुळे सदर संस्थेचे ऑडीट दहा वर्ष नव्हते ते या शेतकरी यांनी तक्रारी केल्यामुळे सदर संस्थेचे ऑडीट झाले.
परंतु वरील सहा शेतकरी यांना न्याय मिळाला नाही. सदरचे ऑडीट आर बी तिपे यांनी राजकीय दबावाखाली थातूर मातूर ऑडीट केले सदर संस्थेचे पिडीत शेतकरी यांनी रास्ता रोको आंदोलन केले, स्मशानभूमीत आमरण उपोषण केले.२ ऑक्टोबरला २०२० रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे उपोषण केले.परंतु चौकशी अधिकारी नेमणूक करतो असे लेखी दिले परंतु आज पर्यंत न्याय मिळाला नाही. म्हणुन दि २४/०५/२०२१पासून धरणे आदोलन चालू आहे.आज धरणे आदोलनाचा ३८ वा दिवस आहे .तरीही कोणतीही दखल घेतली नाही. म्हणुन संतप्त शेतकरी यांनी मुख्यमंत्री व सहकार मंत्री याचे कडे इच्छा मरणाची परवानगी १३१ शेतकरी यांनी मागीतली आहे – सूर्यकांत चिकणे
0 Comments