गुळपोळी/प्रतिनिधी:
गुळपोळी येथे खासदार सुप्रीया ताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे लावण्यात आली. नेहरू युवती मंडळ गुळपोळी यांचे वतीने झाडे लावण्यात आली.
यावेळी नेहरू युवती मंडळाच्या अध्यक्ष रेखा सूर्यकांत चिकणे, उमा भाऊ शेलार, रमा बाबू काशीद, द्रौपदी अर्जून गोरे, मंदा रवींद्र गायकवाड, कोंडाबाई बाबु काशीद, दत्तात्रय कृष्णा मोटकुळे, विश्वनाथ राणू तुपसमिंदरे, अतुल सूर्यकांत चिकणे, शिवाजी सूर्यकांत चिकणे यांनी वृक्षारोपण केले व प्रत्येकाने एक एक झाड संगोपन करण्याची जबाबदारी घेतली.
या वेळी नेहरू युवती मंडळाच्या अध्यक्षा असे म्हणाल्या सर्वाना विनंती करते की गुळपोळी गावातील प्रत्येक घरातील माणसाने आपल्या सासरी गेलेल्या मुलीची आठवण म्हणुन एक झाड लावावे असे मी गुळपोळी गावातील सर्व कुटुंबांना आव्हान करत आहे, प्रत्येक कुटूंबाने एक झाड लावावे व लेकीचे झाड अभियान गुळपोळीत राबवावे.सदरची झाडे लावण्यासाठी व ट्रीगार्ड साठी आर्थिक मदत श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे यांनी केली.
0 Comments