शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; वर्षा बंगल्यावर खलबत


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने छापे टाकल्यावर राजकारणातील घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

राष्ट्रवादीचे बडे नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारासही दाखल झाले आहेत. शरद पवारांसोबतच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परबही पोहोचले आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली?, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समजू शकलेली नाही.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सीबीआयनंतर ईडीने छापेमारी केली. यानंतर ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.  दरम्यान, ईडीने अनिल देशमुखांना अटक केली तर ठाकरे सरकारला मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Post a Comment

0 Comments