पुन्हा एकदा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वादळाची चाहुल…


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये पोहोचले आहेत.शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.

आज प्रशांत किशोर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी पोहोचले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होत आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केले.


Post a Comment

0 Comments