"वंचित व गरजू घटकांना मास्क वाटप करीत शासन नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात केले आव्हान : पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे"


 जयसिंगपुर पोलिस स्टेशनच्यावतीने गरजू घटकांना मास्क वाटप करून कोव्हिड -१९ व शासन नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व व इतर पोलिस बांधवांना शहरातील नागरिकांस आव्हान केले.
        
कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी राज्य शासन सातत्याने जनतेच्या स्वास्थ्यासाठी व  हितासाठी नियमावली तयार करीत असते. जनतेचा आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा शासन नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्रपणे सेवा बजावित आहेत. हे त्यांच्या नोकरीच्या कर्तव्याचा भाग असून ते  प्रामाणिकपणे करीत आहेत. 
   

 परंतु पोलिस हा देखील समाजातील एक घटक असून त्यांचा ही समाजाप्रती संवेदना असतात त्याचाच भाग म्हणून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असणाऱ्या झोपडपट्टी,डवरी सोसायटी, स्टेट बँक ऑफ इंडिया व  जयसिंगपूरातील शिवभोजन केंद्रात थांबलेल्या  वंचित व गरजू घटकांना मास्क वाटप केले आहे. तसेच त्या ठिकाणी त्यांनी कोरोना साखळी तोडण्याबद्दल व शासन नियमांची माहिती देऊन  घरी राहण्याबद्दल आवाहन केले. त्याचबरोबर तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतरांचे पालन करणे व हात साबणाने धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत या घटकांचे प्रबोधन केले.
        
या उपक्रमामध्ये पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या सोबत  ASI देशमुख, WPSI स्नेहल टकले, पोलीस कॉन्स्टेबल भातमारे, रोहित डावाळ, होमगार्ड दीपाली चव्हाण व अन्य मंडळी उपस्थित होते.
       
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या सामाजिक अभिनिवेश व अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments