गोकुळच्या अध्यक्षपदी "या" व्यक्तीची बिनविरोध निवड कोल्हापूर/प्रतिनिधी:

 कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. सत्तारुढ आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नेत्यांनी विश्वास पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांचे नाव जाहीर केले.

या पदासाठी सत्तारुढ गटातून विश्वास पाटील आणि ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यात चुरस होती.आज शुक्रवारी दुपारी एक वाजता होणाऱ्या निवड सभेत करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी गुरुवारी दिवसभर नेते व संचालकांच्या स्वतंत्र बैठका होऊन वैयक्तिक मते आजमावली गेली. यानंतरही नाव निश्चित न झाल्याने अखेर अध्यक्षपदाचे दावेदार असलेले विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्यापैकी एक नाव लिफाफ्यात बंद करण्यात आले. तो लिफाफा आज नेत्यांनी संचालक मंडळाकडे पाठविला.

Post a Comment

0 Comments