मंगळवेढा ! तालुक्यातील “या” गावाला कोरोनाचा विळखा; संपूर्ण गावच सील


मंगळवेढा/प्रतिनिधी : तालुक्यातील मरवडे या गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. कोरोना बाधितांचा संख्या वाढत असल्याने पुढील काही दिवस मरवडे गावात कडक नियम लागू करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी याबाबतचे आदेश काढले आहे.

प्रतिबंधीत क्षेत्राच्या नियमामुळे मरवडेसह इतर प्रतिबंधित झालेल्या गावातील नागरिकांना १ मे पर्यंत बाहेर जाता किंवा आत येता येणार नाही. नियमांचे काटेकोर पालन न केल्यास अधिक कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

या काळात फक्त जीवनावश्यक सेवा म्हणजे आरोग्य विषयक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, शासकीय सेवा सुरु राहतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मरवडे प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाल्याने मंगळवेढा पोलिसांनी नाकाबंदी करण्याचे काम हाती घेतले आहे. मरवडे मधील सर्व दुकानांसह भाजीपाला, मटण, चिकन मासे विक्रीही बंद राहणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेऊन कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामासाठी बाहेर येणार नाही किंवा जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रांताधिकारी उदयसिंह भोसले आणि यांनी दिले आहेत.

यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने देखील रोज किमान ५० घरांचा सर्वेक्षण करून बाधित रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तीची यादी करून जवळपास २८ दिवस वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा, तसेच पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात करून सर्व आस्थापना पूर्ण बंद राहतील यासाठी सजग राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांनी दिलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments