"धरणगुत्तीमध्ये अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकात्मिक बाल विकास सेवा योजना' कार्यक्रम यशस्वीपणे उत्साहात संपन्न"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :


शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व समाज हितार्थ पोषण पंधरवडा व किशोरवयीन मुलींची HB तपासणी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     

प्रारंभिक मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमात प्रसिद्ध महिला धन्वंतरी डॉ. उर्मिला देसाई व बालविकास अधिकारी सौ.संगीता गुजर यांनी 'आहार व आरोग्य आणि पोषण पंधरवडा' या या विषयावर  मौलिक मार्गदर्शन केले.तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.वासंती पाटील यांनी किशोरवयीन मुलींच्यात वयानुसार होणारे बद्दल याबाबत शास्त्रशुद्धपणे तपशीलवार सविस्तर माहिती दिली. तसेच सामाजिक कार्यकर्त्या स्मिता कांबळे यांनी किशोरवयीन मुलींना शिक्षण व करिअर याबद्दल सविस्तर  माहिती देऊन त्यांच्यात करिअर विषयक आशावाद निर्माण केला.त्याचबरोबर १६ मार्च ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत अंगणवाडीमध्ये उद्घाटन सोहळा,गृहभेटी,परसबाग महत्व व HBतपासणी,पाककृती,CBE कार्यक्रम असे विविध समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्यात आले.
      
या कार्यक्रमास सरपंच सौ.विजया कांबळे,बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ.संगीता गुजर, डॉ.उर्मिला देसाई,वैद्यकीय अधिकारी डॉ.वासंती पाटील,CHO डॉ. शुभांगी कवठेकर,आरोग्य सेविका एस.बी.मुल्ला तसेच ग्रामपंचायत सदस्या,अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा स्वयंसेविका आदी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला महिलांनी कोविड -१९  नियमांच्या अधीन राहून हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.तसेच हा कार्यक्रम महिला हितार्थ असल्यामुळे सर्व महिला समाधानी व आनंदी होत्या.

Post a Comment

2 Comments