केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर अजूनही आंदोलन सुरूच आहे. २६ मार्चला शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्चला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, अशी माहीती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. याबाबतचे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोशल माध्यमांवर प्रसिध्द झाले आहे.
आतापर्यंत या आंदोलनात जवळपास ३००हून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत.
भाजपा सरकारने सार्वजनिक मालमत्ता विकण्याचे लोकविरोधी निर्णय घेतले आहेत. इंधन व गॅस सिलेंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत. या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने २६ मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. जिल्हा, तालुका पातळीवर निर्धाराने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे.
0 Comments