राज्यात कोरोनाचं कहर वाढत आहे. त्यातच एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या
‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी’, असं त्यांनी ट्विट केलं. तसेच माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नागरिकांना सजग राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेनेतील अनेक मंत्री आणि नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता
शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुपूत्र आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.
0 Comments