माझा नाही, तर कुणाचाच नाही', म्हणत तरुणीने केले भयंकर कृत्य


नवी दिल्ली : एका तरूणीने प्रियकाराचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरले म्हणून मुलाच्या अंगावर अ‍ॅसिड ओतून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना आग्रा येथे घडली आहे. मुलीने आपल्या घरी बोलवून तरुणावर अ‍ॅसिड ओतले आणि नंतर तरुण जोरजोरात ओरडू लागला, तडफडू लागला. या मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे घटनास्थळी दाखल झाले. सदरील भयंकर प्रकार बघीतल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. माञ, उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला. आग्र्याच्या हरिपर्वत भागात वरील घटना घडली आहे. 

आरोपी मुलीला ठोकल्या बेड्या : सूञांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला घराचा पंखा खराब झाल्याचे सागून घरी बोलवले होते. माञ, मुलगा घरी आल्यावर तिने त्याच्या अंगावर अ‍ॅसिड ओतून हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. माञ, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे. मुलीच्याही अंगावर थोड्याफार प्रमाणात अ‍ॅसिड उडाले आहे. त्यामुळे तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण ती बरी झाली की तिच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लग्न ठरल्यानंतर दोघांमध्ये झाला वाद : आरोपी मुलगी सोनम ही पेशाने नर्स होती. तर पीडित मुलगा देवेंद्र हा आग्र्यातील एका लॅबमध्ये असिस्टंट म्हणून कार्यरत होता. तो उत्तर प्रदेशच्या कासगंज येथील रहिवासी होता. देवेंद्र आणि सोनम यांचे मागील कित्येक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, देवेंद्रचं लग्न ठरल्याने दोघांमध्ये वारंवार वाद व्हायला लागले होते. मुलाचे लग्न ठारले असले तरी ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्याचे नाते पूर्णपणे संपले नव्हते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

रागाच्या भरात अ‍ॅसिडचा केला हल्ला : देवेंद्रचे लग्न ठरल्याने सोनमच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता. याच रागाच्या भरात तिने देवेंद्रवर अ‍ॅसिड हल्ला करण्याचे ठरवले होते. तिने अचानक देवेंद्रला पंखा बिघडल्याचे सांगत तो पंखा सुधारण्यासाठी घरी बोलावले. देवेंद्र घरी पोहोचल्यानंतर तिने त्याच्यासोबत शाब्दिक बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात तिने त्याच्या अंगावर अ‍ॅसिड टाकले, अशी माहिती समोर आली आहे. 

Post a Comment

0 Comments