राष्ट्रवादी काँग्रेस कडून पंढरपूर पोटनिवडणुकीतील उमेदवार फिक्स, शिवसेना काँग्रेसचा सहमतीने घोषणा


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ असणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हिरवा कंदील दिला आहे. मात्र महा विकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना व काँग्रेस यांच्या सहमतीनंतर पंढरपूर पोटनिवडणुकीचा उमेदवार घोषित होणार आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा भालके कुटुंबातील असणार का राष्ट्रवादी काँग्रेस  बाहेरील उमेदवारी द्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादांनी कार्यकर्त्यांना गट-तट विसरून काम करण्याचे आव्हान....

२१ मार्च रोजी पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा  मेळाव्यामध्ये अजितदादा व जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची विचारविनिमय करून त्यांची मते जाणून घेतली त्यावेळी कार्यकर्त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा उमेदवार हा भालके कुटुंबातील असावा असा आग्रह धरला मात्र मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तीव्र मतभेद अजितदादा व जयंत पाटील यांना दिसून आले.  प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना गट-तट विसरून काम करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना करावे लागेल यामुळे राज्य स्तरावरील  नेत्यांना लक्ष काढणची गरज निर्माण झाली अजित दादा यांनी कार्यकर्त्यांना गटातंटाचे राजकारण बंद कामाला लागण्याचा दम दिला आहे.



भारत भालके यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याची मागणी...

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची मतदार संघावर एक हाती पकड होती मात्र अकाली निधनामुळे या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी मधूनच विरोध होत आहे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी राडा केला मात्र पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे मात्र भगीरथ भालके यांच्या नावाबाबत राष्ट्रवादीमध्ये संभ्रम आहे तर जयश्रीताई भालके यांच्या नावाचा विचार होण्याची दिसत आहे भगीरथ भालके यांच्या उमेदवारीबाबत काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे यामुळेच राष्ट्रवादीमध्ये बंडाळी निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेना व काँग्रेसच्या गटात...

२१ मार्च राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांचं पंढरपूर पोट निवडणूक संदर्भात राष्ट्रवादीचे उमेदवार हिरवा कंदील दाखवण्यात आला मात्र राज्यात राष्ट्रवादी चे घटक  अक्षय असणारे शिवसेना व काँग्रेस पक्षा मध्ये राष्ट्रवादी उमेदवारीबाबत चर्चा होणार आहे या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घोषित केला जाईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. मात्र महा विकास आघाडीचे घटक पक्ष असणार स्वाभिमानी संघटना व शेतकरी कामगार पक्ष यांनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments