गोकुळ ची निवडणूक महाविकास आघाडी लढणार; ग्रामविकास मंत्र्यांची माहितीगोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही याची उत्कंठता शुक्रवारी संपली निवडणुकी संदर्भात संचालक मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी, असे आदेश दिले आहेत, दरम्यान प्राधिकृत अधिकारी डॉक्टर गजेंद्र देशमुख यांनी तीन हजार ६५६ सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक महाविकासआघाडी म्हणून एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले ते म्हणाले जिल्ह्यातील गोकुळ दूध संस्था महत्त्वाची आहे ही निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली व्हावी म्हणून पालकमंत्री सतेज पाटील आमदार पी एन पाटील व मी स्वतः दोन वेळा बैठक झाली न्यायालयाच्या निर्णयामुळे थांबलो होतो आता पुन्हा आम्ही एकत्रित येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळच्या निवडणुकीलाही स्थगिती मिळावी, असा विनंती अर्ज गोकुळच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केला होता . यावर मंगळवार दि .२ रोजी सुनावणी होवून न्यायालयाने गोकुळची मागणी अमान्य केली होती . त्यानंतर पुन्हा नव्याने याचिका दाखल केली आहे . यावर दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती

Post a Comment

0 Comments