मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर सत्र न्यायालयाने मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंबादास हरिबा यादव यांना मंगळवेढा न्यायालय विठोली शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अंबादास यादव यांना सहा महिन्यांची सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड तसेच पीडित मुलीस पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे शिक्षा पंढरपूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन के मोरे यांनी मंगळवेढा न्यायालयाची दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे. आरोपी पोलिस उपनिरीक्षकाची अपील न्यायालयाने फेटाळला.

मंगळवेढा पोलीस ठाण्यात अंबादास यादव यांच्याकडून मुलीचा विनयभंग...

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील पीडित मुलीस एका तरुणाने पळून नेले होते. त्यानंतर मुलीच्या आईने मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मंगळवेढा पोलिसांनी तपास करत असताना सदर मुलगी अकलूज येथील बसस्थानकावर असल्याचे कळून आले. त्यानंतर त्या मुलीस मंगळवेढा पोलिस ठाण्यांमध्ये आणण्यात आले. मात्र महिला पोलिस कर्मचारी ठाण्यामध्ये हजर नसल्यामुळे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अंबादास यादव यांनी सदर मुलीचा विनयभंग केल्या होता.

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

 विनयभंगप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला नाही. सदर पीडित मुलीने मंगळवेढा न्यायालय मध्ये धाव घेत सदर  तत्कालीन उपनिरीक्षक यादव यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  मंगळवेढा येथील न्यायालयाने नेहमीच फौजदारी खटलाच्या सुनावणी घेवून आरोपी पोलिस उपनिरीक्षकास सहा महिने सतक्तमजुरी व १० हजार दंड व पिडीत मुलीस ५ हजार रुपये नुकसान भरपाईची देण्याचा आदेश दिला होता. सदर पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी पंढरपूर अतिरिक्त न्यायालयामध्ये या प्रकरणात दाद मागितली होती मात्र पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम केली.

Post a Comment

0 Comments