पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी विरोधी पक्षाकडून सातत्याने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अँटालिया स्फोटप्रकरणात सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली कार आपणच ठेवल्याची वाझे यांनी कबुली दिल्याचं एनआयएच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक असल्याने पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
अँटालिया येथे स्फोटकांनी भरलेली कार सापडली. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर वाझे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. विरोधकांनी वाझेंकडून तपास काढून घेण्याची मागणी केली होती. त्याची सिंग यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पोलीसांना जबाब दिला. त्यात वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचीही दखल घेऊन सिंग यांनी वाझेंवर कारवाई केली नाही.
0 Comments