अमरावती- शयनकक्षात शेजारच्या अल्पवयीन मुलाला गुपचूप उभे करून त्याच्यासमोर पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या ३५ वर्षीय पतीविरुद्ध खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खुद्द पत्नीने शनिवारी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबीती कथन केली.
खोलापुरी गेट पोलिसांनी या प्रकरणात पतीविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (क) सहकलम १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर मुलगा हा या दाम्पत्याच्या घराशेजारी राहतो.
आपले खासगी आयुष्य पतीच दुसऱ्यापुढे, अर्थात ज्याला मुलासमान वागवित आहोत, त्याच्यापुढे उघड करीत असल्याचे लक्षात येताच महिलेला प्रचंड धक्का बसला. त्या सरळमार्गी जीवन जगणाऱ्या महिलेने थेट खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. समाजात जे घडते, त्याचे दर्शन माध्यमांवर होते की त्याच्या उलट होते, याबाबत भिन्न मतप्रवाह आहेत. मात्र, वरवर सरळमार्गी जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील प्रमुख असलेला पती हा वाहिनीवरील मालिकांनी प्रभावित होऊन या प्रकाराला चटावला असावा, असा अंदाज या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
0 Comments