"शिरोळ तालुक्यात मनसेमध्ये खांदे पालट व इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मनसेमध्ये दाखल"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:

संभाजीपुर येथील कट्टर महाराष्ट्र सैनिक कुमार पुदाले यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरोळ तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी जयसिंगपूरसह पंचक्रोशीतील गावातील शेकडो विविध पक्षातील आजी-माजी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.

कुमार पुदाले यांना निवडीचे पत्र हे पक्षाच्या जयसिंगपूर येथील  "राजगड"  मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात कोल्हापूर जिल्हा संपर्कध्यक्ष जयराज (दादा) लांडगे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजाननराव जाधव व वाहतूक जिल्हा संघटक संजय (आबा) भंडारे यांच्या हस्ते  सत्कार करून देण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना पुदाले यांनी राजसाहेबांना अभिप्रेत असणार महाराष्ट्र घडवण्यासाठी व  शिरोळ तालुक्यातील सर्व विंगच्या आजी - माजी पदाधिकारी यांना सोबत घेऊन काम करून जनतेचे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत (दादा) जांभळे,जयसिंगपूर शहराध्यक्ष निलेश भिसे,उपाध्यक्ष अमित पाटील,माजी तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सुशांत पाटील,धरणगुत्ती सोशल मिडिया अध्यक्ष रोहित जाधव,अमित पुदाले,सागर माळी,सौरभ पवार,वर्धमान नरळे,दिपक पांडव,अमित पाटील,अक्षय माळी आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments