परमबीर सिंहांची सुप्रीम कोर्टात याचिका; गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ!


 माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आधीच खळबळ उडाली आहे. अनिल देशमुखांकडून मात्र या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. यासंदर्भात आता एक मोठी घडामोड समोर येत आहे. 

आता परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी गृहरक्षक दलात झालेल्या त्यांच्या बदलीला आव्हान दिले आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदी असताना त्यांना पदावरुन हटवण्यात आले होते. 

त्यांच्याकडून काही अक्षम्य अशा चुका झाल्या असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. आता परमबीर सिंह यांनी त्यांच्या बदलीविरोधात सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहेत. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

 मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत देखील आपण लेखी पुरावा राहावा म्हणून हे पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

"या याचिकेत केलेले आरोप जर खोटे असतील आणि वाझे लहान पदावरील ऑफिसर असतील तर वाझे अनिल देशमुखांच्या घरी का जात होते? अनिल देशमुखांच्या घरचे सीसीटीव्ही तपासा", असे परमबीर सिंह यांनी सांगितले आहे.

 सचिन वाझे यांचे जगाला निरोप देण्याचे स्टेटस पाहून, परमबीर सिंह यांना वरिष्ठांनी 'त्यांना समजावा!' म्हणून फोन सुद्धा केले होते असेही सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments