बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी नगरपालिका ही सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि लोकसंख्या असलेली नगरपालिका आहे . बार्शीत आरोग्य विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षण चालू केले यात चांगला प्रतिसाद मिळत असताना, सर्व काम उत्कृष्ट पद्धतीने पार पडत असताना ,आरोग्य विभागातील काही कर्मचारी बेजबाबदार पणाने काम करताना दिसून येतात .
कित्येक वेळा दवाखान्याचे औषधे रस्त्यावर पडलेली दिसून येत होती याचे फोटो देखील सोशल मीडिया वर व्हायरल होत होते. आज बार्शी परंडा रोड जवळ सावंत स्टील मर्चट च्या मागे वैद वस्ती रोड वर मेडीसिन, औषधे, इंजेक्सन पडलेली दिसून येत आहेत .ही घटना होण्याआधी कित्येक घटना घडल्या होत्या यापूर्वी देखील अशीच घटना घडल्यानंतर स्थानिकांनी कारवाही करण्याची मागणी केली होती परंतु, ही कारवाही का झाली नाही असा प्रश्न यातून निर्माण होत आहे .
जर त्या वेळेसच कारवाही झाली असती तर, आज ही वेळच आली नसती अस अशी चर्चा होत आहे. ही औषधे दुपारी एक ते तीन च्या सुमारास संपूर्ण रोड वर पडलेली दिसून येत होती.ही संपूर्ण रोडवर असल्याने नागरिकांना,वाहनांना देखील अडथळा निर्माण होत होता. यात विविध कंपन्यांचे औषधे नागरिकांच्या घरासमोर पडली होती.यापासून काहीही कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ शकते लहान मुले,फिरस्थी जनावरे रस्त्यावर फिरतात यांच्या जीवास हानी झाल्यास याला जबाबदर नगरपालिका अथवा आरोग्य विभागाचे कर्मचारी राहणार आहेत का?याकडे संबंधित आरोग्य अधिकारी/सर्वच प्रशासन यांचे लक्ष नाही का?ही सर्व औषधे नष्ट करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असून याकडे कोणाचेच लक्ष नाही.अशी चर्चा होत आहे.
तरी ज्या दवाखान्याचे/ कर्मचाऱ्याचे हे कृत्य आहे त्यांना शोधून काढून तात्काळ कारवाही करावी.अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.
0 Comments