मनसुख हिरेन यांच्या तोंडात रुमाल कोंबून हत्या? कसा होता वाझेचा कट जाणून घ्या !


अंबानींच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकांचे प्रकरण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपाशी जाऊन थांबले. आणि या सर्व प्रकरणांमध्ये  निलंबित पोलीस  सचिन वाझे  यांचा  कट असल्याचे  समोर आले. 

 आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मनसुख हिरेन या व्यापाऱ्याचा मृत्यू हा तोंडात चार रूमाल कोंबल्याने आणि त्यानंतर गळा दाबल्याने श्वास कोंडून झाला आहे. 

मनसुख हिरेनच्या हत्येचा असा आहे घटनाक्रम

 मनसुख हिरेन यांना वाझे यांनी सोबत घेऊन घोडबंदर रोड येथे जायचे असे सांगितले. परंतू, गाडी गेली ठाण्याच्या रेतीबंदरकडे! येथे जात असताना मनसुख हिरेन यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्यावरून नाराजी व्यक्त केली. यामुळे, मनसुखच्या तोंडात चार रुमाल कोंबून क्लोरोफॉर्मचा वापर करून त्यांना दुखापत किंवा कुठलीही इजा होऊ नये, त्यांनी आरडाओरडा करू नये अशा पद्धतीने त्यांचा श्वास कोंडून मारण्यात आले. या चार रुमालांची फॉरेन्सिक तपासणी सध्या सुरू आहे. मनसुख हिरेनचा मृत्यू गळा दाबल्याने गुदमरून झाला आणि तसेच त्यांचा मृतदेह खाडीमध्ये फेकून देण्यात आला. ATS च्या सुत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख चा मृत्यू होताना वाझे हे घटनास्थळाजवळ कारमध्ये बसलेले होते.

हिरेनच्या हत्येवेळी वाझे डोंगरी येथील टीप्सी बारमध्ये रेड करत होते. असा बनाव रचन्यात आला. परंतु हिरेनच्या हत्येवेळी ते घटनास्थळी उपस्थित राहून कारमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणेच्या घोडबंदर परिसरातून निघाल्यानंतर सचिन वाझेने मोठ्या चालाखीने सर्वात आधी मुंबई पोलीस मुख्यालय गाठले. तेथून सीआययू येथील आपल्या ऑफिस मध्ये गेले. तिथे आपला मोबाईल चार्जिंग लावला. जेणेकरून त्यांचे लोकेशन पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात दिसायला हवे. सचिन वाझे यांनी ATS ला आपले स्टेटमेंट देतांना म्हटले की, ४ मार्चला ते पूर्ण दिवस मुंबई पोलीस मुख्यालयाच्या सीआययु ऑफिसमध्ये होते. परंतु त्यांच्या मोबाईल लोकेशनच्या माहितीनुसार ते दुपारी  १२.४८ मिनिटांनी चेंबुरच्या MMRDA कॉलनीमध्ये होते. याचा अर्थ सचिन वाझे यांनी हिरेनेच्या हत्येचा तपास झाल्यास तो भरकटवण्यासाठी पूर्ण प्लॅन तयार ठेवला होता.

Post a Comment

0 Comments