मोडनिंब-भारत सरकारतर्फे मध्य रेल्वेच्या सल्लागार पदी वैशाली शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय मध्य रेल अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अन्य राज्यांचा समावेश आहे. सौ वैशाली शिंदे बोलताना म्हणाले की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला रेल्वे विभागात सल्लागार समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची खूप मोठी संधी मिळाली आहे.
या निवडीमागे सर्व हितचिंतकांचा आयडल इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक पालकांचा तसेच महाराष्ट्रातील नागरिकांचा हातभार आहे,नवीन जबाबदाऱ्या नव्या क्षेत्रातील आव्हाने खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा नेहमी प्रेरणादायी ठरतील, या पदाचा वापर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थी नागरिकांना रेल्वेच्या सुविधा जास्तीत जास्त मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे असा विश्वास वैशाली शिंदे मॅडम यांनी व्यक्त केला. यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ बहुजन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय गाजरे अनिल सरवदे, आप्पा ओहोळ सतीश वाघमारे आयडियल इंटरनॅशनल स्कूल चे शिक्षक व पालक उपस्थित होते.
0 Comments