"देशाच्या सामाजिक -आर्थिक विकासाचा मुख्य स्त्रोत या महिला असून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या सुरक्षितता व सबलीकरणासाठी कटिबद्ध राहीन: युवा उद्योजक प्रविण पाटील"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून देशपातळीवर विविध कार्यक्रमाची विविध पातळ्यांवर औपचारिक आयोजन करण्यात येत असते. मात्र खऱ्या अर्थाने महिलांच्या सुरक्षितता व सबलीकरणासाठी कटिबद्ध असणारी माणसे व संस्था या हाताच्या बोटावर  मोजण्याइतपत असतात त्यापैकीच सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक प्रवीण पाटील हे या कामासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक क्षण आणि दिवस हा महिला सन्मानाचा दिवस असला पाहिजे असे त्यांचे प्रामाणिक मत आहे.
    
युवा उद्योजक पाटील यांना कमी वयामध्ये विचार व कार्याची परिपक्वता आल्यामुळे सातत्याने स्वतः यशस्वी युवा उद्योजक म्हणून कार्य करीत असताना एक सामाजिक बांधिलकी व महिलांना आर्थिक सक्षम  करण्यासाठी ते सातत्याने महिलाविषयक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. कधी महिलांना सुरक्षितता प्रधान करणे, उद्योजकता व सबलीकरण या  साठी कार्यरत असतात. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये महिलांच्यासाठी ते पोटतिडकीने बोलत असतात,तर कधी महिलांच्या सुरक्षितेसाठी शिवराई अवतरली पाहिजे अशा प्रकारची ते अपेक्षा करीत असतात यासाठी  स्वतः प्रयत्नशील असतात.त्यांनी असंख्य महिलांना उद्योग दिले असून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. तसेच त्यांच्या प्रत्येक भाषणाच्या सरतेशेवटी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहण्यासाठी ते वचनबद्ध होतात. त्यांची ही महिला विषयी सन्मानार्थ भूमिका ही इतरांना आदर्श व प्रेरणा देणारी आहे.त्यामुळे या  दिनाच्या निमित्ताने महिला या देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे मुख्य स्त्रोत असून हे स्त्रोत भक्कम करण्यासाठी ते प्रयत्नशील  आहेत.

Post a Comment

0 Comments