मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने आपल्या ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.सचिनने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. तसेच घरातील इतर सर्वांच्या कोविड चाचण्या या निगेटिव्ह आल्याचंही सचिननं ट्वीट करुन सांगितलं आहे. 

सचिननं सांगितलं की, आम्ही सर्वजण व्यवस्थित आहोत. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करत आहोत. तसेच, सचिननं सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात येत्या रविवारी म्हणजे येत्या २८ मार्चच्या रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिला आहे.

Post a Comment

0 Comments