सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-१९ सेंटर पुन्हा चालू करावे - आमदार प्रणिती शिंदे


सोलापूर/प्रतिनिधी:

गेल्या वर्षी संपूर्ण जगभरात कोरोना चा प्रादुर्भाव निर्माण झाला होता त्यामुळे सोलापूर शहरात सुद्धा कोव्हीड
-१९ रुग्णांचे प्रमाण वाढले होते त्यामुळे सोलापुरातील विविध हॉस्पिटल सोबत ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मध्ये सुद्धा कोव्हीड-१९ सेंटरची स्थापना करण्यात आली होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील कोव्हीड-१९ सेंटर बंद करण्यात आले होते. 

परंतु गेल्या महिन्यापासून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयावर अतिरिक्त रुग्णसंख्या झाल्यामुळे तेथे मुबलक बेडची व्यवस्था नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील बंद असलेले ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील कोव्हीड १९ सेंटर तात्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून ई एस आय व रेलवे हॉस्पिटल मधील बंद असलेल्या कोव्हीड १९ सेंटर पुन्हा सुरू करून रुग्णाच्या उपचाराकरिता सोय करून देण्यात यावे. अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Post a Comment

0 Comments