फडणवीसांची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ; संजय राऊतांची बोचरी टिका


 शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका करत नरेंद्र मोदींपेक्षा फडणवीस मोठे आहेत असे राऊत यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेते फडणवीस हे मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 

तसेच, परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का? असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली. ते म्हणाले की, चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या.चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, विरोधी विरोधी पक्षनेत्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.  वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही, असं राऊत म्हणाले.  


 

Post a Comment

0 Comments