आघाडी सरकारचे आमदार फोडता येत नसल्याने भाजप कडून केंद्राचा वापर करुन सरकार बदलण्याचे प्रयत्न - राष्ट्रवादी काँग्रेस


महाराष्ट्रात आता भाजपला आमदार फोडता येत नाही, म्हणून महाविकासआघाडी सरकारला बदनाम करून, केंद्राचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार बदलता येईल असे प्रयत्न भाजप करत असल्याचं सांगत कॅबिनेट मंत्री ना.नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप केंद्राचा वापर करुन सरकार बदलाचे प्रयत्न होतं असल्याचं सांगत भाजपावर पलटवार केला आहे यावरून राष्ट्रवादी देखील भाजपाला उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे, मात्र भाजपनं ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपाल यांनी शिफारस करावी अशी मागणी लावून धरली आहे. तर आज देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्र, पेनड्राईव्ह केंद्रीय गृह विभागाच्या सचिव यांच्याकडे देऊन राजकीय वातावरण अधिक तापावले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर अनेक प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे.


 

Post a Comment

0 Comments