"युवा उद्योजक प्रविण पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांचेशी आरोग्यविषयक प्रश्नांबाबत सुसंवाद "

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:

एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून युवा उद्योजक प्रविण पाटील यांनी विविध प्रश्नांशी संबंधित असणारे निवेदन विविध पदावर कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, खासदार व आमदार यांना ते सातत्याने देत असतात. मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश राणू साळे यांचेशी जिल्ह्यातील आरोग्यविषयक प्रश्नांची सांगोपांग व सकारात्मक चर्चा केली.
       
प्रविण पाटील यांच्या सामाजिक कार्याचा झपाटा पाहून असंख्य लोक त्यांना नेहमीच  त्यांचे सामाजिक कार्य पूर्ण करण्यास सहकार्य करीत असतात. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले काम हे समाजासाठी लाभदायक ठरल्यामुळे ते सातत्याने जिल्हा आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य केंद्रे व  उपकेंद्रे लोकांच्यासाठी सर्व सोयींनी युक्त परिपूर्ण व्हावीत अशी त्यांची अपेक्षा आहे. 

यासाठी आज त्यांनी जिल्हा आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.साळे यांचेशी आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण व विस्तारीकरण, नवीन स्टाफची संख्या वाढविणे, पर्याप्त व पुरेशा होईल इतका औषधाचा साठा व पुरवठा करणे, कोरोना लसीची मोठ्या प्रमाणात सोय करावी व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अशा असंख्य फलदायी विषयावरती त्यांनी सांगोपांग चर्चा व सुसंवाद झाला.डॉ.साळे यांच्याकडून या कामासाठी आम्ही व आमची पूर्ण टीम याकामी कटिबद्ध आहोत अशी माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

Post a Comment

0 Comments