बार्शी नगरपालिकेत च शासन निर्णयाचा उडवला फज्जा; चक्क नगरपालिकेत विमा मास्क


बार्शी/प्रतिनिधी:

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. बार्शी मध्ये देखील बार्शी नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांना मोठ्या प्रमाणात आवाहन करत आहेत.

 काल दि. १७/०३/२०२१ रोजी बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दगडे पाटील मॅडम यांनी स्वतः कोरोनाच्या नियम व अटी पाळा म्हणून मुख्य बाजारपेठेत स्वतः फिरून आवाहन केले व दुकानदारांकडून पावत्या देखील केल्या गेल्या. आणि याच बार्शी नगरपालिकेत चालू असलेल्या कोरोणाच्या संदर्भातील मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये सर्व अधिकारी , मुख्याधिकरी ,नगरसेवक व लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. परंतु,मीटिंग मध्ये सर्व च विनमास्क गप्पा मारताना फोटो व्हायरल होत आहे.आणि हे फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाल्याने सर्व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आणि सर्वत्र हीच चर्चा आहे , की सर्वसामान्य नागरिकांना च शासनाचे नियम लागू आहेत आणि अधिकारी व पदाधिकारी यांना नियम नाहीत का ? यांच्याकडून दंड अकरणा केली जाणार का ? अशी उलट – सुलट चर्चा चालू आहे.पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे कर्मचारी यांनी दुकानदार,व्यापारी वर्ग यांच्या दुकानात जाऊन पावत्या केल्या जातात ,मग नगरपालिकेत असणाऱ्या किती कर्मचारी यांचेकडून विणामास्क चे किती पावत्या केल्या गेल्या अशी देखील चर्चा होत आहे.जीलाधिकारी मिलींद शंभरकर आणि राज्याचे मुख्यमंत्री याबाबत काय कारवाई करतील याकडे बार्शी करांचे लक्ष लागले आहे.

शासनाने थोडी समज देऊन व कायदेशीर रित्या पालन करून योग्य ते निर्णय घ्यावा , अशी चर्चा आहे.आणि हा सर्व प्रकार एका फेसबुक लाईव्ह वरून समोर आलेला आहे .

 


 

Post a Comment

0 Comments