प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत जयसिंगपूर कॉलेजमध्ये डिजिटल साक्षरता अभियानाला सुरुवात झाली. या अभियानास विद्यार्थ्यांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी प्रारंभिक या कार्यक्रमातील उपस्थितांचे मनस्वी स्वागत करून या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना म्हणाले की, आजचे योग डिजिटल असून डिजिटल तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना त्याची माहिती व ज्ञान असणे गरजेचे आहे यासाठी या कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व डिजिटल तंत्रज्ञानाचे तज्ञ मा.कासमअली फकीर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,प्रत्येक गोष्टीची साक्षरता असणे आवश्यक याच धर्तीवर या देशातील ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल साक्षर करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व दैनंदिन जीवनात काही समस्या निर्माण होत असतात जसे सरकारी सुविधांचा लाभ , ऑनलाईन फॉर्म भरणे, ई-मेल पाठवणे, इंटरनेटचा वापर विविध कार्यासाठी करणे ,ऑनलाइन पेमेंट व रजिस्ट्रेशन करणे अशा असंख्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी डिजिटल साक्षर असणे काळाची गरज आहे अशा प्रकारचे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले. या अभियानाची माहिती देत असताना ती म्हणाली की या अभियानाचा हा कोर्स १० तासांच्या कॉम्प्युटर ट्रेनिंगवर आधारित असून त्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाकडून डिजिटल साक्षरता प्रमाणपत्र देण्यात येईल अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली. हा कोर्स १४ ते ६० या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला करता येत असून या कोर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेचा प्रचार व प्रसार करणे हा एकमेव उदात्त हेतू शासनाचा आहे. यासाठी हे अभियान आपल्या कॉलेजमध्ये राबवण्यात येत असल्याचे त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी डिजिटल साक्षरतेची प्राथमिक स्वरूपात माहिती दिली.
या डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रमास प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम.ए.- भाग २ ची विद्यार्थिनी कु.यास्मिन मुल्ला हिने मानले. तर या सुंदर अशा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जीवन आवळे एम.ए.भाग- १ अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांने केले. सदर कार्यक्रमास प्रा.सौ.स्वाती माळकर, प्रा. मेहबूब मुजावर ,एम.ए.भाग- १ चा वर्ग प्रतिनिधी विनीत रांजणे, व अर्थशास्त्राचे असंख्य विद्यार्थी या कार्यक्रमास मनोभावे उपस्थित होते. या वेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
1 Comments
👍👍👍
ReplyDelete