बार्शी/प्रतिनिधी:
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात वाढत असणारी कोरोनाची संख्या यामुळे शनिवार आणि रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मार्केट मधील सर्वच दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद ठेवण्यात येणार आहेत, याच पार्श्वभूमीवर बार्शी बाजार भाजी मार्केटमध्ये तोबा गर्दी उसळली होती.
सोशल डिस्टंसिंग चे वाजले तीनतेरा
ग्राहकांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंग या नियमाला हरताळ फासला गेला, कित्येक भाजीवाले व ग्राहक विना मास्क भाजी मार्केटमध्ये दिसत होते. कोरोना नियमावली नीट समजून घेण्याची गरज आहे.
सातच्या आत घरात
नविन नियमानुसार सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यत दुकाने उगडी राहणार असून त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बन्ध घालण्यात आले आहेत. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन करा. आरोग्य विभाग पोलीस प्रशासनास सहकार्य करा. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरऊ नका, सुरक्षित रहा.
0 Comments