....आता तर हे स्पष्ट आहे ठाकरे सरकार भ्रष्ट आहे : चंद्रकांत पाटील


भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणात आपले मत मांडताना सांगितले की महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने आपल्या कामगिरीने हे सिद्ध केले आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचे पूर्णपणे गुन्हेगारीकरण झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा शंभर कोटींची वसुली करण्यास सांगितले होते. पोलिसांकडून जबरदस्तीने‌ वसुली करून घेणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.

भाजपाने आज देशमुख यांच्या पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहेत, असं म्हणत देशमुखांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. आंदोलनावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,”मी दोन तीन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं.

पाटील यांनी पुढे सांगितले की आता केवळ अनिल देशमुख यांनी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सरकारला राजीनामा द्यायला हवा. अनिल देशमुख यांची १०० कोटींची गोष्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शरद पवार सर्वांना ठाऊक होती परंतु सर्व गप्प होते !


 

Post a Comment

0 Comments