जळगावात सांगली पॅटर्न! शिवसेनेने केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा


आज जळगाव महापालिकेच्या महपौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये शिवसेनेला ४५ मते मिळाली. भाजपच्या २७ नगरसेवकांना गळाला लावून शिवसेनेने गिरीश महाजन यांच्या अस्तित्वाला सुरूंग लावला आहे. जळगाव महापालिकेत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांच्याकडे महापौर पदाची धुरा आली आहे. या निवडणुकीसाठी ठाण्यातून सूत्रे हलविण्यात आली होती.

भाजपाच्या ५७ नगरसेवकांपैकी २७  नगरसेवक हे शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सांगली पॅटर्न राबवल्याचे चित्र दिसून आले आहे.

भाजपला फटका देऊन शिवसेनेच्या गोटात सामील झालेले ते २७ नगरसेवक सेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्या सर्व नगरसेवकांना ठाण्यातील एका हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहे. भाजपच्या या नगरसेवकांसोबत एमआयएमचे तीन नगरसेवकही शिवसेनेसोबत आहेत. या बंडखोर नगरसेवकांसोबत शिवसेनेचे १० नगरसेवकही ठाण्यातील हॉटेलमधील वास्तव्यास आहेत. म्हणजेच जळगाव महापालिकेचे एकूण ४० नगरसेवक हे या हॉटेल मध्ये थांबले आहेत.

जळगाव महापालिकेमध्ये एकूण ७५ नगरसेवक आहेत. महपौर निवडीवेळी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एकूण ३८  नगरसेवक पाहिजेत. सध्या ठाण्यातील हॉटेलमध्ये ४० नगरसेवक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचेच पारडे जड होते. जळगाव महापालिकेतील पराभव हा भाजपनेते गिरीष महाजन यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

विकासासाठी पक्ष प्रवेश-

जळगाव महापौर निवडणुकी संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह २७ भाजप नगरसेवक ठाण्यातील एका हॉटेल मध्ये आले आहेत. हे नगरसेवक कोणीही बळजबरीने आणले नाहीत, ते स्वखुशीने आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते मंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्याकडे आले होते. त्यामुळे त्यांना ठाण्यात ठेवण्यात आले आहे. जळगावचा विकास आणि भाजप नगरसेवकांची नाराजीमुळे हे नगरसेवक सेनेत आले असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments