राष्ट्रीय पैलवान ते एस.टी.महामंडळात दाखल ; पै.प्रदीपचा यशस्वी प्रवास...


शिवाजी विद्यापीठात रोज शिक्षण घेत असताना  आपल्या बिरादरीलं आपल्या समवेत कोण तरी आहे याचं समाधान वाटण्याचा मुळ स्त्रोत म्हणजे पै.प्रदिप तानुगडे.... 
   
आपल्या बिरादरीलं असं म्हणण्याच माझं कारण की आम्ही दोन्ही पैलवान बिरादरीले.... 

दोघे एकत्र बसलो की आमचं मन विद्यापीठात कधी थांबतच नव्हतं, ते धावायला लागायचं कुस्तीकडे, तालमीकडे आणि तांबड्या मातीकडे... 
  
तोच पैलवानकीचा विषय... 
मी याला असं हरवलं, मी त्याला तसं ढाकेवर चित मारलं, मी त्याला असा बॅक थ्रो टाकला.... 
असंच सर्व कुस्तीवरच चर्चासत्र संपल की परत आप आपल्या अभ्यासकाकडे वळाचं पण मन मात्र कुस्तीतच रेंगाळत राहायचं.... 
पै.प्रदिप ला आम्ही आप्पा म्हणतो... 
आप्पाचा मितभाषी व शांत स्वभाव मनाला कायम भावतो... 
या जोरावरच आप्पाने विद्यापीठात मित्रांचा समुह सभोवती गोळा केला.आपण भलं अन् आपला अभ्यास भलं, असा आप्पाचा रोजचा दिनक्रम असायचा... समाजशास्त्र अधिविभागात शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत मोठ्या प्रयत्नांनी आप्पाने एस.टी.महामंडळात लिपिक पदाची नोकरी मिळवली.पैलवानाने ही अभ्यास केला तर तो ही चांगली सरकारी नोकरी मिळवू शकतो हे आप्पाने नुकतच दाखवून दिलं.

अनेक मैदाने गाजवणारा एक तगडा राष्ट्रीय मल्ल ते आता सरकारी नोकरदार असा यशस्वी प्रवास इतर मल्लांना देखील प्रेरणादायी आहे.अंगा पिंडाने रांगडा पण मनाने दिलदार व खुप आपुलकीने बोलणारा माणुस म्हणजे आप्पा.... 

आज आप्पाचा वाढदिवस, या निमित्त आप्पाच्या सर्व आकांक्षा, मनोकामना पुर्ण होवो हिच सदिच्छा.... 

✍🏻 पै.मतीन शेख ( फेसबुक वरुन साभार )

Post a Comment

0 Comments