बार्शी! रस्तापूरचा ग्रामसेवक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या ताब्यात



बार्शी/प्रतिनिधी:

तक्रारदार हे सरपंच असून बाळासाहेब धर्मे हे रस्तापुर गावचे ग्रामसेवक आहेत. तक्रारदार यांनी पदरखर्चाने काही ग्रामविकास कामे केली होती , ग्रामविकास निधीअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेतून तक्रारदार यांना त्यांचे

स्वखर्चाची रक्कम परत मिळणेकरिता संबंधित वस्तू खरेदी केलेल्या दुकानदारास रक्कम मिळणेकरिता चेक काढावे लागतात. त्याकरिता यातील तक्रारदार यांनी चेकवर स्वाक्षरी केलेल्या आहेत परंतु यातील ग्रामसेवक यांनी सदर चेकवर स्वाक्षरी करण्याकरिता तक्रारदार यांचेकडे ग्राम विकास निधीच्या एकूण रक्कम ₹ ८,५०,०००/- च्या सुमारे 3 % रक्कम बक्षीस- लाच म्हणून ₹ २६,०००/- ची मागणी केली व तडजोड म्हणून २.१/२ रक्कम ₹ २१,२५०/- सापळा कारवाई दरम्यान स्वीकारली असता यातील ग्रामसेवक याना रंगेहात पकडण्यात आले आहे.

 ही कारवाही श्री राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, ला प्र वि पुणे परिक्षेत्र सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.

यांच्या मार्गदर्शनाखाली

सापळा पथक : -श्री. संजीव पाटील, पोलीस उपअधीक्षक,
श्रीमती कविता मुसळे पोलीस निरीक्षक,
पोलीस अंमलदार -अर्चना स्वामी, उमेश पवार, स्वप्नील सन्नके यांनी पार पडली .

कोणत्याही लोकसेवक यांनी आपणास लाचेची मागणी केल्यास टोल फ्री १०६४ या क्रमांकावर संपर्क करा .असे आवाहन केले आहे .

Post a Comment

0 Comments