शारीरिक संबंधानंतर अश्लील व्हिडिओ बनवून विवाहितेला ब्लॅकमेल


पुणे/प्रतिनिधी:

एका महिलेच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन तिला ब्लॅकमेल करत एका तरुणाने तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर या संपुर्ण घटनेचे चित्रीकरण करत त्या तरुणाने पीडित महिलेला पुन्हा ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तसेच एके दिवशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने तिचे अश्लील व्हिडिओ फेसबुकद्वारे तिचा पती, भाऊ, आणि नातेवाईकांना पाठवल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली, असता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेच्या प्रेमप्रकरणाच्या माहितीचा गैरफायदा-

या प्रकरणाची अधिक माहिती अशी, पीडित महिला ३४ वर्षे वयाची आहे. पती नेहमी दारू पिऊन मारहाण करीत असल्यामुळे २०१५ पासून ती पतीपासून विभक्त राहून आईवडिलांसोबत बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते. त्यानंतरच्या काळात तिचे घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू झाले होते. त्याच परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला याची माहिती होती. त्याने पीडित महिला आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहिले होते. याच आधारे त्याने पीडित महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने नकार दिला असता, घरच्यांना सांगेन अशी धमकी दिली.

आरोपीने मार्च २०२० मध्ये ब्लॅकमेल करीत तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. यावेळी त्याने पीडित महिलेच्या नकळत तिचे व्हिडिओ काढले. या व्हिडिओच्या आधारे तो तिला वारंवार ब्लॅकमेल करू लागला. त्या व्हिडिओची भीती दाखवून तो तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवू लागला.

Post a Comment

0 Comments