मुंबई हायकोर्टात १३ नवे न्यायाधीश ; अजूनही १७ पदे रिक्त


 नऊ ज्येष्ठ वकील तसेच चार न्यायिक अधिकारी अशा १३ जणांची मे.मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक करण्याची शिफारस मे. सुप्रीम काेर्टाच्या कॉलेजियमने केली.

 सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. एन. व्ही. रमणा व न्या. रोहिन्टन नरिमन यांचा कॉलेजियममध्ये समावेश आहे. 
ज्या नावांची मे.मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आली आहे, त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

कॉलेजियमने 
१)अरुणा पै, 
२)शैलेश ब्रह्मे, 
३)कमल खाता, 
४)शर्मिला देशमुख, 
५)अमिरा अब्दुल रझाक, 
६)संदीप मारणे, 
७)संदीप पारिख, 
८)सोमशेखर सुंदरेसन,
 ९)महेंद्र नेर्लिकर 
या नऊ जणांचा समावेश आहे. 

राजेश लढ्ढा, संजय मेहरे, जी. ए. सानप, एस. जी. डिगे या चार न्यायिक अधिकाऱ्यांच्या नावाचीही मे.मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यास कॉलेजियमने शिफारस केली आहे. 

मे.मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची ९४ पदे असून, आता त्यातील १७ पदे रिक्त आहेत.

Post a Comment

0 Comments