"जयसिंगपूर कॉलेजचा विद्यार्थी विक्रांत माळी याचा राजस्थानमध्ये झालेल्या राष्ट्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

राज्यस्थान मधील चित्तोडगड या गावामध्ये दि. १२ व १३ मार्च २०२१ रोजी  'चित्तोडगड फोर्ट फेस्टिवल' मध्ये जयसिंगपूर कॉलेजचा विद्यार्थी विक्रांत माळी याने या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत  द्वितीय क्रमांक पटकावून त्याने कॉलेज बरोबर महाराष्ट्र राज्याचे मान व सन्मान उंचाविला आहे.
          
राजस्थानमधील चितोडगड या ठिकाणी दरवर्षी किल्ला महोत्सव  मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो. यामध्ये  देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून  विविध स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक येत असतात.  या फेस्टिव्हलमध्ये Shobha Yatra , Run for   fort, cultural programs, Sports Horse Dance, Talent Of Chottorgarh, Star Night Fireworks, Deepdan and Village Safari  अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.
     
जयसिंगपूर कॉलेजचा विद्यार्थी विक्रांत गुरुदेव माळी यांनी या स्पर्धेच्या कल्चर प्रोग्राम मध्ये सहभागी होता. सदर महोत्सवाची माहिती त्यांचे काका उदयसिंह माळी यांनी दिली. या फेस्टिवलमध्ये विक्रांत माळी या विद्यार्थ्याने लेडीज अँड जेन्ट्स  आवाजामध्ये गायन केले. ' पधारो रे म्हारे देश ' हे गाणं कथा स्वरूपात गायन केला. या गायनाच्या स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकाविला. 
    
 सदर कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पॅराशुट ऍडव्हर्टाईस साठी आणले होते त्यातून हा कार्यक्रम भारदस्त व जल्लोष पूर्ण दिसत होता. चित्तोडगड गावामध्ये पूर्ण किल्ल्याला विद्युत रोशनाई करण्यात आली होती. प्रत्येक घरोघरी  लोकांनी एक प्रकारे दिवाळी कशी साजरी करतो अशाप्रकारे घरावरती लावण्यात आली.या महोत्सवाला विविध जाती धर्माचे लोक मेवाड ,माळी ,राजपूत आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
      
विक्रांत माळी हा जयसिंगपूर कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाचा विद्यार्थी प्रतिनिधी असून तो सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून गायनाच्या विविध स्पर्धेमध्ये सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवित असतो. विक्रांत माळी या  विद्यार्थ्यांचे गायन स्पर्धेत मिळालेल्या यश व पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. जयसिंगपूर कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे,प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार व इतर मान्यवरांनी त्याचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments